20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण राहील. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल', असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. 'इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याचं कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे. 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदारच नाही राहिले, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल', असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
एकीकडे बच्चू कडू यांनी हा दावा केला असतानाच 14 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये निकाल विरोधात गेला तर राज्य सरकारचा प्लान बी तर बच्चू कडूंनी बोलून दाखवला नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment