Tuesday, February 14, 2023

आ.धनंजय मुंडे यांचा पवनराजे बँकेच्या वतीने सत्कार व शुभेच्छा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अपघातानंतर प्रकृती ठिक होताच राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आ.धनंजय मुंडे हे आज दीड महिन्यानंतर परळी शहरात आले असता पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत व सहकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सोमवार दि.13 फेब्रुवारी रोजी आ.धनंजय मुंडे यांच्या पंढरी या निवासस्थानी पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत व सहकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पवनराजे ग्रुपचे उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे आणि मित्र परिवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment