Thursday, February 9, 2023

आमदार डॉ प्रज्ञा राजीव यांच्यावर जीवघेणा हल्ला आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात.


हिंगोली (प्रतिनिधी) :- कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे आमदार डॉ प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात
Written by:-Gopal Satpute हिंगोली:-विधान परिषदेच्या काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी (८ फेब्रुवारी) रात्री ८.३० वाजता कसबे धावंडा गावात एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केला. त्याने आमदार डाॅ. सातव मार्गदर्शन करत असताना त्यांना मागे ओढून त्यांच्या गालात चापट मारली. डॉ. सातव यांनी स्वतः सोशल मीडियावर या हल्ल्याची माहिती दिली. डॉ. प्रज्ञा सातव बुधवारी रात्रीच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे गेल्या होत्या. त्या गावकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना एक व्यक्ती पाठीमागून आली अन् अचानक सातव यांना बाजूला ओढून त्यांच्या गालावर चापट मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आमदार डॉ. सातव तसेच गावकरीही गोंधळून गेले. डॉ. सातव तातडीने वाहनात बसून थेट कळमनुरीत दाखल झाल्या. त्यानंतर रात्री कळमनुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गावात जाऊन महेंद्र डोंगरदिवे यास ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment