या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते. उरूस सुरू असताना अचानक वळू भाविकांमध्ये शिरला. या घटनेमुळे भाविकांची धावपळ उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 20 भाविक जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उरुसामध्ये वळू शिरला
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद (Osmanabad) शहरात सध्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस सुरू आहे. उरुसामध्ये सुरू असलेल्या धार्मिक कर्यक्रमाला तब्बल 15 हजार लोकांची उपस्थिती होती.
धार्मिक कार्यक्रम सुरू असताना पहाटे तीनच्या सुमारास अचानक एक अनियंत्रीत झालेल्या वळू भाविकांमध्ये शिरला. वळू उधळल्यानं भाविकांची धावपळ उडाली. यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 20 भाविक जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पोलीस घटनास्थळी हजर
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांसोबत वैद्यकीय पथकही आले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment