Monday, February 13, 2023

50 वर्षानंतर श्री सरस्वती विद्यालयाचे वर्गमित्र पुन्हा एकत्र.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वर्षा मागून वर्ष सलग जातात, आपले सहकारी मित्र व आपण वेगवेगळया गावी नोकरी अथवा व्यवसाच्या निमित्ताने कार्यरत राहतो...परंतू मैत्रीला ऋणानुबंधाचे नाते असल्याने ते नेहमी एकत्र येतच असतात. त्याचा चांगला प्रत्यय श्री सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घडवून आणत 50 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 
श्री सरस्वती विद्यालयातील 1973 ची बॅच आज पुन्हा एकदा एकत्र आली. सुमारे 50 वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्र आले आहेत. विटा येथील राजेशदादा विटेकर यांच्या फार्म हाऊसमध्ये यानिमित्ताने एक छानसा कार्यक्रम पार पडला, भास्करमामा चाटे, अभयकुमार ठक्कर, रामकिशन लड्डा, डॉ.कांतीलाल बोरा, राधेशाम सारडा, लक्ष्मण आलदे, वैजनाथ क्षीरसागर, मधुकर गित्ते, नारायणराव सातपुते, अ‍ॅड.नागोराव देशमुख, पत्रकार मित्र दत्तामामा लांडे, डॉ.सदाशिव देशपांडे, दिपीका सेठीया, निर्मलाताई आपेट, कुसूमताई मराठे, संजीवनी दहिवाळ, प्रभावती देशमुख, नारायणी झंवर, सुमंगला कुलकर्णी, कांता अग्रवाल आणि निर्मलाताई विटेकर हे यावेळी उपस्थित होते. शाळेच्या जुन्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या, शाळेतील जुन्या आठवणी असा छान कार्यक्रम रंगला होता. विशेष म्हणजे गप्पांच्या या कार्यक्रमात हुरड्यांचाही आस्वाद सर्वांनी घेतला. विटेकर यांनी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. शाळा संपून आता 50 वर्ष झाली परंतू आजही हे सर्व विद्यार्थी दशेतच एकमेकांना मनापासून भेटले.

No comments:

Post a Comment