* ३ सुळे दात, १५ नखे व इतर भागाचे हाड व मोटारसायकल जप्त: वन पथकाची कारवाई.
भंडारा (कांतीकारी साथी न्युज) वाघाचे ३ सुळे दात, १५ वाघ नखे व इतर अवयवांची विक्री करतांना वन विभागाच्या पथकांनी दोघांना रंगेहाथ अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता च्या दरम्यान दक्षता विभाग, वनविभाग नागपुर, फिरते पथक भंडारा तसेच वनक्षेत्र नाकाडोंगरी येथील वनकर्मचारी, वनाधिकारी यांनी संयुक्तरित्या खबरी मार्फत मिळालेल्या वाघाच्या अवयवांची तस्करी करण्याऱ्या रामु जयराम उईके रा. पवनारखारी, ता.तुमसर, जि. भंडारा व संजय श्रीराम पुष्पतोडे रा. चिखला, ता. तुमसर, जि. भंडारा यांना बनावट ग्राहक बनून सापळा रचुन वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या अनुसूची १ मधिल वन्यप्राणी वाघाच्या शरीर अवयवांसह रंगेहात विक्री करीत असतांना पकडण्यात आले.
आरोपींकडून ३ सुळे दात, १५ वाघ नखे व इतर शरीराचे हाडांचे अवशेष व मोटारसायकल जप्त करण्यात आले असुन या वन्यजीव अपराध प्रकरणात वरील दोन्ही आरोपींना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या वनअपराध प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियम ९७२ अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली आहे. या वन्यजीव अपराध प्रकरणाचा अधिक तपास रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपुर, राहुल गवई उपवनसंरक्षक, भंडारा वनविभाग भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली साकेत शेंडे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, गडेगाव आगार वनविभाग भंडारा व वनपरिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी सि.जी. रहांगडाले, संजय मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक भंडारा हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment