भंडारा (कांतीकारी साथी न्युज) मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे जनावरांची अवैध वाहतूक करणार्या वाहनावर तूफान दगडफेक करून वाहकाला गंभीर जखमी करणार्या आठ जणांना अटक करून मोहाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याच प्रकरणात आपली जबाबदारी पार न पाडल्याचा ठपका ठेवत आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी व एका कर्मचार्याना पोलिस अधीक्षकांनी निलंबित केल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
कत्तलखान्यात अवैध जनावरे घेऊन जाणार्या वाहनावर मोहाडी तालुक्यातील कांद्री गावाजवळ ८ जणांनी तूफान दगडफेक केल्याने वाहक मोहम्मद उस्मान (३७ वर्ष ) रा. कामठी, जि. नागपूर हा गंभीर जखमी झाला असून सध्या तो अतिदक्षता विभागात दाखल आहे. या प्रकरणात शेख मोहसीन शेख नसिर (रा. कामठी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दगडफेक करणार्या शेखर बडवाईक याचेसह सात जणांवर भादंवि ३०७, ३४, १४३, १४७, १४८ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम १३५ नुसार गुन्हा नोंदविला. गुरुवारी रात्री शेखर बडवाईक याला अटक करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment