
मुंबई : - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल मे २०२१ परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा exam २९ एप्रिल ते २० मे रोजी होणार आहे तर बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित केली गेली आहे. तसेच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता पुढच्या २ दिवसांत बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा exam १२ एप्रिल ते २८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे तर इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment