Monday, March 15, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य १५ मार्च २०२१ : पाहा कशी असेल आठवड्याची सुरुवात.


 आजचे राशी भविष्य १५ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आयटी. आणि बॅंकिंग क्षेत्रातील लोकांसाठी दिवस संघर्षमय असेल. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. आरोग्य निरोगी राहील. गरीबांना दानधर्म करा. शुभ रंग - निळा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: राजकारणाशी संबंधित व्यक्तींना यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. नोकरीत प्रगती होईल. दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल. शुभ रंग - पांढरा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रेमपूर्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत तुमची संध्याकाळ आनंदात जाईल. शुभ रंग - निळा. 
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. तुमची आई तुमच्यावर खूश होईल. भेटवस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे. दिवस तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. शुभ रंग - पांढरा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात यश मिळेल. घराच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. राजकारणातील व्यक्तींना दिवस चांगला जाईल. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग - निळा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. आयटी आणि मीडिया क्षेत्रात जॉब करणाऱ्यांना यश मिळेल. एखाद्या नव्या व्यवसायासंबंधी योजना आखाल. दाम्पत्य जीवनात तणाव राहील. लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ रंग - लाल.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी प्राप्त होतील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस लाभदायक ठरेल. तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग - पिवळा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रवासाला जाताना काळजी घ्या. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. शुभ रंग - पांढरा. 
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण राहील. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. भगवान श्री गणेशाची आराधना करा. शुभ रंग - निळा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करणं टाळा. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवाल. प्रवासाचा योग निर्माण होईल. शुभ रंग - पिवळा. 
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कार्यात यश मिळेल. दाम्पत्यांचे जीवन अनुकूल राहील. आरोग्य निरोगी राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. शुभ रंग - पांढरा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: भगवान श्री गणेशाची पूजा करा. धनलाभ होईल. तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. गरीबांना दान-धर्म करा. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग - लाल.

No comments:

Post a Comment