कांतीकारी साथी न्युज – शिवसेनेनं (ShivSena) सत्ताधारी भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) भगवा फडकवला आहे. बीडमधील भाजपचे माजी आमदार व पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे निकटवर्तीय केशव आंधळे (Keshav Andhale) यांनी आज जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या (Nationalist Congress Party – NCP) बैठकीला हजेरी लावली. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अगोदर बँकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपची पिछेहाट होत असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाल्यानं चर्चेला उधाण आल्याचं दिसत आहे.
No comments:
Post a Comment