Thursday, March 18, 2021

रिजर्व बँक ऑफ इंडिया ची परीक्षा पहिल्यांदाच मराठीतून होणार. लाखो विद्यार्थ्यांना दिलासा.


बल्लारपूर (प्रतिनीधी  ) : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किंवा परीक्षा म्हंटली की देशपातळीवर कोणतीही होणारी परीक्षा ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून होत असते त्यामुळे भाषेअभावी अनेक विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते शिवाय या दोन्ही भाषेशीवाय कोणताही पर्याय नसतो मात्र आता राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे रिजर्व बँक ऑफ इंडिया ने ऑफिस असिस्टंट या पदासाठी च्या परीक्षेसाठी पहिल्यांदाच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया ने ८४१ पदासाठी ऑफिस असिस्टंट भर्ती प्रक्रिया राबविली असतांना मुंबई विभागात 202 आणि नागपूर विभागात 55 पदाची भर्ती होत आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मराठी भाषेतून परीक्षा देता येईल.

              या संदर्भात परिक्षार्थिनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा ही मराठी भाषेतून घेण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विंनती आरबीआय ला केली होती या मागणीला यश आले असून सदर परीक्षा मराठी भाषेतून सोडविण्याची सोय उपलब्ध झाली आहे ऑफिस असिस्टंट ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार असून सदर परीक्षा 120 गुणांची असून 90 मिनिटे विद्यार्थ्याना मिळणार आहे देशभरात ही परीक्षा 9 व 10 एप्रिल ला असून देशभरातील 173 केंद्रावर सदर परीक्षा होणार आहे विशेष बाब म्हणजे मराठी सह अन्य 16 भाषेतून ही परीक्षा पार पडणार आहे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात नागपूर विभागात नागपूर, अमरावती व चंद्रपूर तर मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, धुळे, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रावर सदर परीक्षा पार पडणार आहे

No comments:

Post a Comment