Thursday, March 18, 2021

सरपंच,ग्रामसेवकांनी केला लाखोंचा भ्रष्टाचार.अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग?



केज ;- (प्रतिनिधी) केज तालुक्यातील गोटेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांनी संबंधित विभागाचे शाखा अभियंता , विस्ताराधिकारी गटविकास अधिकारी यांच्या संगनमताने शासनाच्या विविध योजना राबविल्याचे कागदोपत्री दाखवून विकास योजनेच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार केला आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोटेगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ता रामदास पवार यांनी केज पंचायत समिती समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.  भ्रष्टाचाराची चौकशी ची मागणी करूनही तीन चार महिन्यांचा काळ लोटला आहे परंतु तरीही गटविकास अधिकारी दत्तात्रयदराडे यांनी या तक्रार निवेदनाची कसलीही दखल घेतलेली दिसून येत नाही.

No comments:

Post a Comment