Thursday, March 11, 2021

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस.


* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती.

CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेतली कोरोनाची लस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) कोरोनाची लस (Covid 19 Vaccine) घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोरोना लस घेणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. यानंतर त्यांना लस देण्यात आली. ही लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.ख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली.

शरद पवार यांना कोरोना लस

दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना लसीकरणे केले होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.

लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल.

No comments:

Post a Comment