Wednesday, March 10, 2021

विद्यार्थ्यांनच्या आरोग्याचा विचार करत. दि 31 मार्च पर्यंत 5 वी ते 9 वी तसेच 11 वी चे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश- जिल्हाधिकारी


 

बीड ; -- बीड जिल्हाधिकारी यांच्या आज रोजीच्या आदेशानुसार म्हणजे उद्या दहा मार्च पर्यंत बंद असलेले शाळा पुढे पुन्हा दि 31 मार्च 2021पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

इयत्ता पाचवी 5 वी ते 9 वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता कोविड संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून पाचवी ते नववी पर्यंत असलेल्या वर्ग व तसेच सर्व माध्यमातील 5 वी ते 9 वी च्या शाळा उद्यापासून दि 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. आज काढलेल्या एका आदेशावरून जाहीर केले आहे. तसेच कोविड संकटात सुरक्षितता पाळावी. सर्वांनी मास्कचा वापर करावा. सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावा असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.

तसेच फक्त 10 वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना या आदेशातून वगळले असून फक्त येता दहावीचेच सुरू असलेले काही ठिकाणच्या शाळा वर्ग आदेशानुसार सुरू राहतील आपात्कालीन व्यवस्थापनात संकटकाळी आदेशाची अंमलबजावणी व्हावी तसेच पुढील आदेशापर्यंत हे आदेश लागू राहतील.

No comments:

Post a Comment