Thursday, March 18, 2021

अंबाजोगाई येथील एस.आर.टी वैद्यकिय रूग्णालया चे डाॕ बिराजदार व टिममुळे आईला मिळाले जीवदान-दिलीप जोशी

* अत्यावस्थ प्रकृती असताना डॉक्टरांचे औषधोपचार ठरले उपयुक्त.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)
परळी वैजनाथ येथील भागिरथीबाई मारोतीराव जोशी यांना निमोनियाची लागण झाली असता परळीत कोणत्याही रूग्णालयात अॕडमिट  करून घेण्यात आले नाही. मी आईला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल केले असता डॉ.सिद्धेश्वर बिराजदार व त्यांच्या टीमने योग्य उपचार करून आईला जीवदानदिले आहे अशी प्रतिक्रिया वंदे मातरम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जोशी यांनी व्यक्त केली. दरम्यान रूग्ण असलेल्या आईने वैद्यनाथाची प्रतिमा डॉ.बिराजदार यांना भेट देवून त्यांचे आभार व्यक्त केले.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात औषधी विभाग प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार व त्यांच्या टीमने माझी आई भागिरथीबाई जोशी यांना जीवदान दिले आहे. अत्यावस्थ अवस्थेत तिला परळीमध्ये उपचार मिळू शकले नाही, परंतू अंबाजोगाईत डॉ.सिद्धेश्वर बिराजदार व त्यांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून आईला जीवदान दिले. तीन दिवस डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर लगेच आराम मिळाला. अंबाजोगाईच्या रूग्णालयात उपचार चांगले होत असून कोरोना कालावधीतही डॉ.बिराजदार यांनी दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी वैद्यनाथाची प्रतिमा डॉ.बिराजदार यांना त्यांच्या आईने भेट देवून आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment