अंबाजोगाई (प्रतिनीधी )- अंबाजोगाई शहरातील बस्थानक परिसरात असलेल्या टॅक्सी च्या खाजगी पार्किंग च्या पाठीमागील बाजूस असलेल्या छोट्या मंदिरा लगत सिद्धार्थ नगर मधील राहिवासी असलेल्या नितीन कैलास साठे वय ३५ वर्ष या युवकाचा मृतदेह रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याने व त्याच्याडोक्यावर चेहर्यावर जखमा झाल्याच्या दिसून आल्याने नितीनचा रात्रीच खून झाल्याचे निष्पन्न झाले आहेया
बाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाई शहरात मागील अकरा दिवसा पूर्वी गणेश मोरे व आज नितीन साठे नामक या दोन युवकांचे खून झाल्याची घटना घडल्या असल्याचे समोर आल्याने शांत व सुसंस्कृत शहरात आता गुंडगिरी मोठया प्रमानात वाढल्याचे दिसू लागले आहे नितीन साठे व राहुल नामक युवका मध्ये मागील आठ दिवसा पूर्वी जोरदार मारामारी झाली होती मात्र प्रकरण तिथंल्या तिथे मिटल्याने त्यावर पडदा पडला होता त्याच प्रकरणा वरून दोन दिवसा पासून दोघांमध्ये धुस फुस सुरु झाल्याने रात्री नितीनला यातील तीन आरोपीनी अज्ञात ठिकाणी डोक्यावर चेहर्यावर धारदार शस्त्रने वार करून टॅक्सी पॉइंट च्या पाठीमागे आणून फेकून दिले असल्याची माहिती त्याच वेळी त्याच्या कुटुंबियांना समजली असता कुटुंबियांतील लोक तेथे पोहोचे पर्यंत मारेकरी तेतुन फरार झाले होते नितीनला त्याचवेळी उपचारासाठी स्वा रा ती मध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले नितीन याच परिसरात चालणार्या एका पत्याच्या क्लब मध्ये काम करत होता तेथील देवाणं घेवाणं मधून ही घटना घडल्याचे बोलले जातं असून शहरात सध्या अनेक प्रकाचे अवेध धंदे प्रचंड प्रमाणात सुरु असल्याने गुंडगिरी मोठया प्रमाणात वाढली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियात आरोपीना ताब्यात घेतल्याचे समजते.
No comments:
Post a Comment