नांदेड येथील गुरुद्वारातून दरवर्षी होळीच्या निमित्ताने मिरवणूक काढली जाते. पण यावर्षी कोविडमुळे नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळ आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. असं असताना देखील काल गुरद्वारा परिसरात मोठ्या संख्येने शीख बांधवांचा जमाव जमला होता. तसेच त्यांनी हल्ला महला मिरवणूक काढण्याचा हट्ट धरला होता.
त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर गुरुद्वारा परिसरातील जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. यामध्ये हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोडही केली. होळी सणाला गालबोट लावणाऱ्या या दुर्घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी आहेत. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी व्हिडीओ पाहून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे.
No comments:
Post a Comment