Thursday, March 18, 2021

रेणापुर पिंपळफाट्याजवळ अंबाजोगाई-लातूर बसचा भीषण अपघात आठ ते नऊ जण गंभीर जखमी दोघे अत्यवस्थ.


रेणापुर ;- (प्रतिनीधी) अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेल्या लातूर डेपोच्या बस क्रमांक एम एच 20  बी एल 1053 या बसच्या चालकाने रेणापुर पिंपळफाटा जवळ मेन रोडवर उभा असलेल्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. आठ च्या दरम्यान झालेला अपघात एवढा मोठा होता की जवळपास अर्धी बस पूर्णपणे चिरली असून अनेक प्रवासी अडकून पडले होते या दुर्घटनेत आठ ते नऊ लोकांना शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे विशेष म्हणजे ड्रायव्हर साईडने जबर धडक दिल्याने ड्रायव्हर्स अडकून पडला होता असे अनेकांनी सांगितले

No comments:

Post a Comment