मुंबई: महाराष्ट्रात कोरोना वेगाने वाढतो आहे. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. लोकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाही, तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
* आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात आहोत :
राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणे म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे, असे टोपे यांनी सांगितले आहे. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
* आढावा बैठका सुरु राहणार. : राज्यात मागील काही दिवसांपासून 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज वाढत आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात दुपारी 12.30 वाजल्यापासून ते 1.30 पर्यंत बैठक पार पडली. दररोज १० टक्के प्रति दिवस रूग्णसंख्येत वाढ होतेय. दोन -तीन दिवस आणखी आढावा घेतला जाणार आहे.
No comments:
Post a Comment