अमरावती : (प्रतिनिधी) महानगरपालिका अमरावती व अमरावती जिल्हा अपंग क्रीडा संस्था येथे दिनांक 2 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांगांच्या आगळ्यावेगळ्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन दिव्यांग मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघाने या स्पर्धेचे आयोजन केले होते यात संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अमरावतीसह वाशिम नागपूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर ठाणे रायगड अकोला सह संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक आले होते तसेच या स्पर्धेमध्ये दिव्यांगांसाठी रक्तदान शिबिर नेत्रदान व आरोग्य तपासणी शिबिर सह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील एक विशेष बाब म्हणजे जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर होण्याचा मान व गिनीज बुक मध्ये नोंद असणारा तसेच दोन जागतिक रेकॉर्ड नावावर असणाऱ्या रायगडच्या प्रतीक मोहिते यांचीही या स्पर्धेमध्ये उपस्थिती होती. त्यांनी या स्पर्धेमध्ये बॉडी बिल्डिंग चे पोज व वन मिनिट शो दाखवून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेचे उद्घाटक डॉ संतोष मुंडे यांनी उद्घाटनपर भाषणात बोलताना या आगळ्यावेगळ्या दिव्यांग स्पर्धेला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देऊ असे उद्गार काढले तसेच सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.
अशा या राज्यस्तरीय दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निकाला मध्ये सिल्वर मेडल निलेश वरोटे अकोला यांनी पटकावले , ब्राँझ मेडल अमोल वाळकी नागपूर यांनी पटकावले ,तसेच चौथ्या स्थानी ज्ञानेश्वर जाधव उस्मानाबाद पाचवे स्थान आशिष आडे वाशिम व इरफान खान अकोला यांनी भूषविले. अशी ही आगळीवेगळी स्पर्धा दिव्यांग बॉडी बिल्डिंग क्षेत्रात ऐतिहासिक ठरणार आहे.अशा या ऐतिहासिक क्षणाला डॉ संतोष मुंडे दिव्यांग मंत्रालय उपाध्यक्ष महाराष्ट्र शासन मुंबई ,अभिजीत पाटील उपाध्यक्ष अमरावती डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक डॉक्टर गोविंद कासट सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत गायकवाड कार्यकारी अभियंता महावितरण आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. तसेच अमरावती डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन सचिव विशाल शिंदे ,प्रीतम पाटील ,नवीन जैस्वाल कल्याण मालदुरे सुशांत रोडे यांचीही उपस्थिती होती.
सागर मनकिकर कर व स्टेज मार्शल रुपेश मेश्राम यांनी या स्पर्धेच्या पंचपदाची जबाबदारी पार पाडली. अशा या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एसबी इलेक्ट्रिकल अँड कंपनी लिमिटेड नागपूर मोहम्मद सलीम सर वरायटी ग्रुप इंटरप्राईजेस लिमिटेड बबलू खान सर डीएसपी सोलार एनर्जी सोल्युशन शैलेंद्र भोपळे सर विदर्भ पावर अँड सर्विस लिमिटेड धनंजय सर वर्कशॉप राजीक सर, रुपेश कोल्हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर जयंत सांगळे इलेक्ट्रिकल राजू बहाळे इंजीनियरिंग यांनी आर्थिक मदत केली.
ही राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी विलास शिंदे केंद्रीय अध्यक्ष भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघ सुभाष चव्हाण राज्यसचिव करुणा बनसोड राज्य उपाध्यक्ष विनोद महागावकर कार्याध्यक्ष प्रशांत शिंदे रवींद्र राठोड विठ्ठल थोटे राज्य समन्वयक उमेश पसरे सुशीला पाटील चरण चव्हाण भूषण श्रीराव डॉक्टर अभिषेक गोएंका अमोल राजगुरे देवकुमार पाटील मनोज माने नंदकिशोर वानखेडे अमोल वनवे विजय सावंत दर्शन धोनोरकर प्रफुल वासनिक वर्षा राठोड सविता अंभोरे सुनंदा कवाने अर्चना मैदान कर सुरेखा चव्हाण जानराव घाटोळ हरिदास रामदास बेलूरकर योगेश बारमासे विनोद रोकडे मनोज बनारसे विजय तायडे ओम शिंदे विनोद शिंदे दत्ता रकतवार उमेश माने एडवोकेट्स विजय वर्मा पंकज देशमुख बाळू धोटे अरविंद जोगळेकर यांनी सहकार्य केले
No comments:
Post a Comment