परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - डिसेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव व सचित्र दर्शन सोहळा मराठवाडा मुक्ती दिवस व एकता दिनाचे औचित्य साधून दि.वा. सेवा संस्थान परळी यांच्या वतीने भव्य आयोजन आर्य वैश्य मंगल कार्यालय येथे आयोजित केले होते त्या प्रसंगी हैद्राबाद संस्थानच्या लढ्यात बलिदान दिलेले, शुरविरांचे दर्शन,भारतीय लढ्यातील सेनानी यांचे दर्शन व अनेक शूरवीरांचा इतिहास नवीन पिढीसाठी ज्ञात व्हावा म्हणून त्यात परळीचे पहिले आमदार मा वामनराव देशमुख चित्रनगर मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा दत्तात्रय दहीवाळ गुरुजी यांचे नावाने भव्य व्यासपीठ उभारले होते. सचित्र दर्शन सोहळ्याचे उद्घाटन हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा. लक्ष्मणराव बोंदर, व सौ पार्वतीबाई ल. बोंदर यांच्या शुभहस्ते करताना मा राजेसाहेब देशमुख मा बाजीराव धर्माधिकारी हे लाभले होते.
या कार्यक्रमास व्याख्याते म्हणून मा डॉ सुरेशचंद्र चौधरी आणि मा श्री विश्वंभर पाठक यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा प्रा डॉ विजयकुमार देशमुख, शिवाजीराव पाटील अंधोरीकर, विजयाताई दहीवाळ, सुधीर फुलारी, विकासराव डूबे, विजय अवस्थी, तुळशीराम पवार, वैजनाथ सोळंके हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडले तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लक्ष्मणराव बोंदर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील संपूर्ण थरार सांगितला. हे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी परळीकरासह विविध शाळेमधील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे निवेदन हे वैशालीताई रुईकर यांनी तर कार्यक्रमाचे कल्पक नियोजन हे सुनीलकुमार जठार, ॲड वैजनाथ वांजरखेडे, जी एस. सौंदळे, शालिनी दहिवाळ, यांनी केले.
No comments:
Post a Comment