जालना (प्रतिनिधी) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर वर बीड कडे जात असलेली अल्टो कार जोराने धडकली या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात लहान मुलीचा समावेश आहे. हा अपघात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री जवळील समर्थ कारखान्याच्या भागात घडला.
या अपघातातील अमोल जाधव, असे एक नाव कळाले असून बाकीच्या मयतांची व नातेवाईकांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती नातेवाईक आल्यानंतर ओळख पटेल, असे पोलिसांनी सांगितले. सदर अल्टो कार ही छत्रपती संभाजीनगर मार्गे बीडकडे निघाली होती. मात्र,समर्थ कारखाना येथे कंटनेर क्र. एच. आर. 38 डब्ल्यू. 9214 हा कंटनेरचा चालक एटीएममधून पैसे काढण्यासाठी कंटनेर संभाजीनगर -बीड राष्ट्रीय महामार्गावर बिडकडे जाताना हायवेवर उभा केला होता. पाठीमागून वडीगोद्रीकडून बीडकडे अल्टो कार क्र.एम. एच. 20 बी.एन. 7773 या अल्टोकारने जोराची धडक दिली. या धडकेत अल्टो कार चकनाचूर झाली आहे. या दुर्घटनेत सात वर्षाच्या मुलीचा समावेश आहे या अपघातात. अमोल कैलास जाधव वय २५- रा. बक्षाचीवाडी ता. अंबड, ओंकार बळीराम गायकवाड वय २१, माऊली (माऊ) संभाजी गायकवाड वय १०, दोघे रा. पिंपरखेड अशी अपघातातील मयतांची नावे आहेत.
No comments:
Post a Comment