माजलगाव (प्रतिनिधी): ‘पोलिस पाटील’ हे गावातील एक मानाचे आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचे पद म्हणून ओळखले जाते. बुधवारी (ता.६) माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातील १९३ गावातील या पदांची सोडत उपविभागीय कार्यालयात झाली. यातील तब्बल ५८ गावातील पदे हि महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. यामुळे तीनही तालुक्यातील ५८ गावात आता महिला पोलिस पाटील हाेणार आहे.
गावात मनाचे समजले जाणारे पोलिस पाटलांचे पद हे मागील अनेक वर्षापासून रिक्त होते. तर काही गावांचे विभाजन झाल्याने उपलब्ध नसलेले हे पद मंजूर करण्यात आले आहे. बुधवारी (ता.६) माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यातील पोलिस पाटलांच्या रिक्त पदासाठी सोडत करण्यात आली. या तीनही तालुक्यातील १९३ पदांची सोडत काढण्यात आली. यातील ५८ पदे हि महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. पूर्वी प्रत्येक तालुक्यात सहसा पुरुषच पोलिस पाटील असायचे. परंतु आता महिलांसाठी ३० टक्के राखीव आरक्षण असल्याने पोलिस पाटलीनींचा रुबाब पाहायला मिळणार आहे.
माजलगाव तालुका
खुला प्रवर्ग : सुरुमगाव, राम पिंपळगाव, शृंगारवाडी, पिंपरी (खु.), सोमठाना, देपेगाव, निपाणी टाकळी, खातवाव्हान, डब्बाथडी, खेरडा (खु.) टालेवाडी, जायकोवाडी, लुखेगाव, शिंदेवाडी, एकबुर्जी, सिम्री पारगाव, कौडगावथडी, छोटेवाडी, सोन्नाथडी, गोदावरी तांडा, गोविंदपूर, गोविंदवाडी. खुला प्रवर्ग (महिला) : महातपुरी, मनुरवाडी, सादोळा, डावरगाव (खु.) रिधोरी, आनंदागाव, छत्रबोरगाव, शहापूर मजरा, हिवरा (बु.). अनुसूचित जाती : पुनंदगाव, आडोळा, देवळा (खु.) आलापूर, पुरुषोत्तमपुरी, जायकोची वाडी, पिंपळगाव (नाकले), इरला मजरा, लोणगाव.
भाटवडगाव, नाकलगाव, उमरी (बु.) सावरगाव, गंगामासला हे पुरुषांसाठी तर, राजेगाव, खरात आडगाव, तालखेड, बाभळगाव, गुंजथडी, साळेगाव, सरवर पिंपळगाव हे महिलांसाठी राखीव. आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग : बेलुरा, घळाटवाडी, लहामेवाडी, मोगरा तर, शेलगावथडी, गव्हाणथडी हे महिलांसाठी राखीव.
No comments:
Post a Comment