Wednesday, December 20, 2023

मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी नायब तहसिलदाराकडून लूट!



बीड (प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र तापलेला असताना बीडमध्ये मात्र कुणबी प्रमाणपत्रासाठी लूट केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जुन्या सरकार दप्तरी कागदपत्रावर कुणबी नोंद आढळल्यानंतर सेतू सुविधा केंद्रामार्फत नाममात्र साठ रुपयात प्रमाणपत्र मिळत असले तरी ऑनलाइन एप्रूवल देण्यासाठी 40 रुपये तर नायब तहसीलदारच्या ऑफलाइन स्वाक्षरीसाठी शंभर रुपये भुृर्दंड लाभार्थ्यास सहन करावा लागत आहे. पण या 140 रुपयांवर एकटी  नायब तहसीलदार दरोडा टाकत आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राजकीय वातावरण देखील तापलेले आहे.सरकार देखील लवचिक भूमिका घेत ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यास अनुकूल आहे. बीड जिल्ह्यात 13128 कुणबी नोंदी जुन्या सरकार दप्तरी कागदपत्रावर आढळलेल्या आहेत. दरम्यान कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सध्या तहसील कार्यालयामध्ये गर्दी दिसू लागली आहे. तहसीलच्या फेरफार कार्यालयातून कुणबी नोंद आढळल्याचा पुरावा मिळवायचा असल्यास तेथे देखील दोनशे ते तीनशे रुपये नाहक खर्च करावे लागतात. कागदपत्र अर्जंट पाहिजे असतील तर जसा समोरची व्यक्ती असेल तसा त्याच्या खिशावर दरोडा टाकला जातो. इथे नोंदणी असलेल्या नकलेचा कागद हातात पडल्यानंतर तो सेतू सुविधा केंद्राकडे द्यावे लागते. या ठिकाणी सेतू सुविधा केंद्राची साठ रुपये फीस आकारली जाते. इथून एप्रूवल घेण्यासाठी नायब तहसीलदार शिरसाट यांच्याकडे जाते. नायब तहसीलदाराचा थाट औरच आहे.एप्रूवल देण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या मुलाकडे अवैधरित्या सोपविलेली आहे. या ठिकाणी 40 रुपये द्यावे लागतात नाहीतर एप्रुवलच मिळत नाही. प्रमाणपत्राला एप्रुवल मिळाल्यानंतर प्रश्न येतो तो नायब तहसीलदारांच्या ऑफलाइन स्वाक्षरीचा यावेळी स्वाक्षरी करायचे शंभर दोनशे रुपये त्या सहज घेतात. अन्यथा त्रुटी काढून प्रस्ताव पाठवलेला आहे असा शेरा मारतात विशेष म्हणजे या कागदपत्रावर तहसीलदारांची स्वाक्षरी देखील असते तरीदेखील ते पैसे दिले नाहीत म्हणून रिजेक्ट करण्याचं काम इमाने इतबारे करत आहेत.पैसे दिले तर मात्र कुठलीच त्रुटी त्यांना दिसत नाही बादरायणी संबंध देखील जोडण्यास त्या मागेपुढे पाहत नाहीत. नायब तहसीलदाराच्या या लुटमारीला आळा घालण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment