नांदेड : (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यासह हदगाव तालुक्यात वाळू आणि मुरुमाची दिवसा ढवळ्या अवैद्य तस्करी शेकडो वाहनांमधून दररोज केली जात आहे. तर याबत स्थानिक नागरिकांची ओरडही ऐकायला मिळत आहे. ती ओरड थोडी का होईना थांबावी म्हणूनच की काय? हदगाव तहसिलच्या पथकाने तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस तीन,चार वाहनांवर कारवाई करत प्रशासन जागे असल्याचे दाखवून दिले.
हदगाव तालुक्याला वालीच कोनी उरला नसल्याने तसेच स्थानिक अधीकाऱ्यांना कोणाचेच भय उरले नसल्याने बामणी फाटा, निवघा, तामसा, तळणी, हडसणी फाटा आदि भागात वाळू तस्करीसह अनेक अवैद्य धंद्यांना अक्षरशः उत आला असल्याचे म्हणटले जात आहे. विशेष म्हणजे याकडे वरिष्ठांचेही लक्ष नसल्याने, दोन नंबरच्या व्यावसायिकांना सध्या चांगले दिवस आले असल्याचे जन साम्यांन्यातून बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment