Tuesday, December 19, 2023

25 वर्षाच्या तरुणाचा निर्घृन खून परिसरात खळबळ...! गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

चाकण (प्रतिनिधी) खराबवाडी गावातील जंबूकरवस्ती येथे एका २५ वर्षीय तरुणाचा निर्घृन खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खराबवाडी गावातील जंबूकरवस्ती येथील आकाश बनसोडे(वय-२५ वर्षे) नामक तरुणाचा खून करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खून करणारे अल्पवयीन आरोपी असल्याचे निदर्शनास आले आहे. या गुन्ह्यातील ३ आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील एका आरोपीला महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने(DB) सीताफिने ताब्यात घेतले असल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. अजून या गुन्ह्यात इतर त्यांचे साथीदारही सामील आहेत का? या संदर्भातील तपास चाकण पोलीस करत आहेत.

प्रथमता खून झालेल्या ठिकाणावरून नक्की खून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला की, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला यावरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर वरिष्ठाच्या सूचनेनुसार झालेल्या खुणाचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून उर्वरित आरोपीना ताब्यात घेण्यासाठी पथके नेमून रवाना केले आहेत.

सध्या चाकण शहर व परिसरात खुनाच्या बऱ्याच गंभीर घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यात बऱ्याच अशा गुन्ह्यात अल्पवयीन आरोपीचा सहभाग दिसून आला आहे. पण अशा घटनाना बऱ्याच अंशी सर्वाधिक पालकच जबाबदार असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुबलक आर्थिक सुबत्ता, अर्धवट शिक्षण, मुलांच्या वाईट कृत्याकडे दुर्लक्ष अशा एक ना अनेक गोष्टीमुळे अशा गोष्टी या परिसरात वाढताना दिसत आहेत. यावर वेळीच पालकांनी आळा घातला नाही तर चाकण शहर व चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी राज झाल्याशिवाय राहणार नाही.

या गुन्ह्याचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment