बीड (प्रतिनिधी) मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर सुरूवातीला ४० दिवस आणि नंतर दोन महिन्याचा कालावधी सरकारने मागविला होता़ आता दि.२४ डिसेंबर रोजी सरकारने मागितलेली दोन महिन्याची डेडलाईन संपत आहे़ मध्यल्या काळात राज्यभरात जरांगे पाटील यांच्या सभा झाल्या असून डेडलाईन संपण्याआधी दि२३ रोजी बीडमध्ये इशारा सभेचे आयोजन केले आहे़ या सभेच्या पुर्वतयारीसाठी दि१५ रोजी बीडमध्ये बैठक घेण्यात आली़
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून लढा उभा केला असून राज्यातील मराठा त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला आहे़ यातूनच सराटी येथे दिड कोटी समाज बांधवाची सभा झालेली आहे़ यानंतर सरकारने कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू केलेले आहे.दरम्यान, सरकारने आरक्षणासाठी दोन महिन्याचा कालावधी मागविला होता़ हा कालावधी २४ डिसेंबर रोजी संपत आहे़अजूनही आरक्षण देण्याच्या दृष्टीने हालचाली दिसत नसल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे़मागील दिड महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विविध भागात सभा घेतलेल्या असून या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता़ सद्यस्थितीत जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचार घेत असून गुरूवारी बीड येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी त्यांची भेट घेतली़ यावेळी बीडमध्ये दि२३ डिसेंबर रोजी इशारा सभा घेण्याची सुचना जरांगे पाटील यांनी केली़ यानंतर शुक्रवारी दुपारी बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांची इशारा सभेच्या नियोजनार्थ सुर्या लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ बैठकीत सभेच्या तयारीनिमीत्त चर्चा करण्यात आली़ शिवाय जबाबदारीचे वाटपही करण्यात आले़ बॅनर पासून ते पाणी, नाश्ता आणि पार्कींच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली़ यावेळी मराठा बांधवांनी जे जे शक्य आहे ते सहकार्य, समाजसेवा देण्याचा शब्दही यावेळी दिला़ यानंतर गुरूवारी नगररोड येथील नियोजीत सभास्थळाची पाहणी केली, परंतु त्याठिकाणी पार्कींग व्यवस्थेचा ताळमेळ बसणार नसल्याने ते मैदान रद्द करून सोलापूर हायवेवरील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या बाजुला असलेल्या मैदानाची निवड करून पाहणी केली़ या मैदानाला पाटील मैदान असे नाव देण्यात आले आहे
No comments:
Post a Comment