नेकनूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लिंबागणेश येथे गुरुवारी ् मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास बसस्थानका जवळील चंद्रकांत आवसरे यांचे श्री गणेश शुज सेंटर आणि औदुंबर नाईकवाडे यांचे ईश्वरभारती कॅफे सेंटर जळुन खाक झाले असून ही दोन्ही दुकाने पेट्रोल टाकून जाळण्यात आले असल्याचा संशय दुकानदारांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि विलास हजारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. मध्यरात्री साडे बारा वाजता लिंबागणेश बसस्थानका जवळ चंद्रकांत आवसरे यांचे श्री गणेश शुज सेंटर दुकान असुन मध्यरात्री लागलेल्या आगीत दुकान जळुन खाक झाले. यामध्ये अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आवसरे यांचे म्हणणे आहे. तसेच याच वेळी औदुंबर नाईकवाडे यांचे शेजारीच ईश्वरभारती कॅफे सेंटर दुकानातील हजार लिटरचे दोन डि फ्रीज,एसी फ्रीज, कुलर, आणि फर्निचर आदी एकुण ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील दोन्ही दुकानं पेट्रोल टाकून जाळ्याचा दुकानदार औदुंबर नाईकवाडे, चंद्रकांत आवसरे यांनी संशय व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment