Sunday, July 2, 2023

राष्ट्रवादीत भूकंप अजित पवार राजभवन वर दाखल.पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?


मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या राज कारणात एक मोठा भूकंप झाला असून, गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेत नेतेही उपस्थित आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवारमहाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे; राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभावनात दाखल झाले आहेत, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत. याशिवाय, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे इतर काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या.  

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. 6 जुलैला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशातच आत अजित पवार सत्तेत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 

No comments:

Post a Comment