बीड (प्रतिनिधी) जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी ‘डेमू रेल्वे’ सेवा 23 सप्टेबर 2022 रोजी मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली होती. मात्र अवघ्या 10 महिन्यात आता ही रेल्वे सेवा बंद पडली आहे. विशेष म्हणजे रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने ही रेल्वे बंद पडल्याचे कारण दिले जात आहे.
अहमदनगर ते आष्टी अशी रेल्वे सुरु करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. दरम्यान दहा महिन्यांपूर्वी म्हणजेच तब्बल 95 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही रेल्वे अखेर सुरू झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या रेल्वे सेवेला ग्रीन सिग्नल देण्यात आले होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.
मात्र दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली अहमदनग-आष्टी रेल्वे आता बंदी पडली आहे. प्रवाशांच्या अत्यंत कमी प्रतिसाद, चालकाची कमतरता आणि अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतिकरणाचे काम सुरू असल्याने या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यात 13 ऑक्टोबरपर्यंत या रेल्वेच्या दोन्ही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर पुन्हा रेल्वे फेऱ्या सुरु झाल्या असतानाच, गेल्या दोन महिन्यापासून या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने सोलापूर रेल्वे प्रशासनाने दोन्ही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment