गत अनेक वर्षांपासून बीडच्या शिरूर शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्डयात पावसाळ्यात पाणी साचत असते. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोपान मोरे यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे. शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या खड्डयाची पूजा करून श्रीफळ फोडून आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर वाजंत्री वाजवून स्थानिक नागरिकांना जागे करत स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ असलेल्या मोठ्या खड्डयाभोवती फुलांची आरास मांडत पूजा केली.
अन् गढूळ पाण्यात केली अंघोळ
यावेळी प्रशासनाच्या निषेधार्ह घोषणा देत साचलेल्या गढूळ पाण्यात मोरे यांनी अंघोळ केली. त्यामुळे आतातरी या नगरपंचायतला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment