Monday, July 31, 2023

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनसेचा रास्ता रोको; शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आंदोलन.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनसैनिकांनी रास्ता रोको करत आपल्या मागण्यांकडे लक्ष  वेधले आहे. यावेळी पोलीस प्रशासन आणि मनसैनिकांमध्ये काही काळ वाद निर्माण झाला. 
बीड शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली. हे रस्ते मान्सूनपूर्व दुरुस्त करणे अपेक्षित होतं. परंतु प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी वाहन धारकांसह पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनसेने रस्ता रोको केला. यावेळी पोलीस प्रशासन व मनसे कार्यकर्तांमध्ये वाद झाला. 

महामार्गावरील वाहतूक खोळंबली 

या आंदोलनामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. आगामी काळात सदरील प्रश्न मार्गी लावला नाही; तर मात्र मनसे  स्टाईल आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला


No comments:

Post a Comment