Sunday, July 30, 2023

कोटा ते कोसरसार रस्त्यातील पुलावर भगदाड.लोकांचा जीव धोक्यात.बांधकाम विभाग झोपेत ;- अभिजित कुडे


वरोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खराब ,रस्त्याची हीच अवस्था अजून किती दिवस राहणार,  सर्व सामान्य माणसाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खांबाळा वरुण जाताना कोटा ते कोसरसार रस्त्यातील पुलावर मोठे भगदाड पडले आहेत.  तरी अजून पर्यंत बांधकाम विभागाला जाग आली नाही.  लोकांच्या जिवाची पर्वा येथील लोक प्रतिनिधी व अधिकार्‍यांना नाही.  इतका मोठा खड्डा पडला आहे की साधी मोटारसायकल जाऊ शकत नाही  . संपूर्ण रस्त्याची हीच अवस्था आहे.  लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
 2 दिवसात खड्डा बुजविण्यात आला नाही तर त्या खड्डय़ात समाधी आंदोलन करणार:- अभिजित कुडे
कनागरिकांनी स्वतः खड्डय़ात दगड टाकून थोडे सुरळीत केले, रात्रीच्या वेळी अपघात होऊ शकते.  3 पण पुलावर खड्डे पडले आहेत: दुर्गश्वर ऐकुडे  गावकरी
*या रस्त्यातील पुलावर चे खड्डय़ात बसुन  प्रशासनाचा निषेध व्यक्त केला . तात्काळ खड्डे बुजवून द्यावे अन्यथा शिवसेना कार्यपद्धती काम करून घेऊ:अभिजित कुडे*
नागरिकांमध्ये  प्रचंड असंतोष आहे तरी तात्काळ काम करावे यावेळी अभिजित कुडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  युवासेना ,दुर्गश्वर ऐकुडे, तेजस ऊरकुडे, भैय्याजी मुंगळे, सुभाष चौधरी, नथ्थुजी पेंदाम,बंडूजी मेश्राम, उपस्थित होते..

No comments:

Post a Comment