याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील संजय नगर भागात असणाऱ्या एका लिंबाच्या झाडाखाली हा मृतदेह आढळला आहे. सचिन साहेबराव चव्हाण वय 25 रा.सुशी तांडा ता.गेवराई असे मृत तरुणाचे नाव आहे.
या घटनेची माहिती कळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेची माहिती घेत पंचनामा केला. दरम्यान मयत सचिन चव्हान याचा खून झालाय की आत्महत्या केली ? याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment