Saturday, July 22, 2023

हिंगणघाट आगाराची माढेळी ते नागरी मार्गे असलेली बससेवा पूर्ववत सुरू करा :- अभिजित कुडे


*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आगार व्यवस्थापक हिंगणघाट याना निवेदन. 

वरोरा (प्रतिनिधी) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविन्द्र भाऊ शिंदे  व  तालुका प्रमुख दत्ता भाऊ बोरेकर  यांच्या  मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांना निवेदन दिले.  गेल्या 2 वर्षापासून माढेली नागरी बससेवा बंद झाली आहे.  आधी  माढेली वाघनख पाटी ,उखर्डा  पाटी ,शेगाव पाटि या मार्गे सुरू असलेली बससेवा पुन्हा सुरू करावी.  रस्ता पूर्ण खराब झाल्या या मार्गाने सुरू असलेली बससेवा बंद झाली होती त्यामुळे या मार्गाने प्रवाशांना  कोणतेच साधन नाही.  शाळा, कॉलेज सुरू झाले आहे, या मार्गावरील लोकाना वाहतुकीचे दुसरे साधन नाही  आता या रस्त्याची डागडुजी झाली आहे व या रस्त्याने बस जावू शकते त्यामुळे बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करावी असे निवेदन आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले.  कलियुगात रस्त्याच्या दुर्दशा झाली होती त्यामुळे बससेवा बंद असल्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो आहे.  विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, प्रवाशांना दुसरा पर्याय नाही.  आधी हिंगणघाट आगाराची बस या मार्गाने सुरू होती पण रस्ता पूर्ण खराब झाल्यामुळे या रस्त्याने बससेवा बंद करण्यात आली .वरोरा  आगाराची बस सुद्धा बंद झाली ती बस पण बंद झाली आहे ती बस या मार्गाने पुन्हा सुरू करा असे निवेदन दिले आहे.

   पण हिंगणघाट आगाराच्या जास्त बसेस या मार्गाने धावतात त्यामुळे बंद झालेली बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणी केली. या भागातील नागरिकांना वरोरा  ला नेहमी कामानिमित्त यावे लागते त्यामुळे गोर गरीब, शेतकर्‍यांना  या मार्गाने  पर्यायी व्यवस्था नाही तात्काळ  या मार्गाने बससेवा सुरू करावी असे निवेदन दिले.  यावेळी युवा सैनिक वैभव पुसदेकर, पंकज मांडवकर, वैभव पावळे , कुणाल ईखार,  तेजस ऊरकुडे  उपस्थित होते..

No comments:

Post a Comment