स्वारगेट परिसरात गाेळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी तत्काळ परिसरातील नाकाबंदी केली. स्वारगेट पोलिसांनी गोळीबार झाल्याचा घटनेला दुजोरा दिला.
ही घटना गणेश कला क्रीडा मंचजवळ असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. पोलिस गोळीबार करणाऱ्या व्यक्तीसोबतच जखमीचाही शोध घेत आहेत. दरम्यान मध्यवस्तीत गाेळीबारच्या घटना घडू लागल्याने नागरिक चिंताग्रस्त झालेत.
No comments:
Post a Comment