Tuesday, July 11, 2023

बीडमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी गावकरी आक्रमक, नेमकं काय आहे प्रकरण?


बीड (प्रतिनिधी) रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी आष्टी -अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग बीडच्या धानोरा येथे अडवण्याचा प्रयत्न केला. बीडच्या आष्टी तालुक्यातील धानोरा- वाहीरा या सहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

या रस्त्यावरून जाताना अनेकांचे बळी जात असल्याने प्रशासनाला तक्रारी देऊनही काहीच होत नाही. म्हणून संतापलेल्या गावकऱ्यांनी आष्टी अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांना ताब्यात घेतले. परंतु, जोपर्यंत रस्ता दुरुस्त होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

No comments:

Post a Comment