Sunday, July 30, 2023

धक्कादायक घटना! आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन.कुटुंबावर शोककळा.

वडवणी (प्रतिनिधी) आर्थिक विवंचनेतून 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यात असणाऱ्या खळवट लिमगाव गावामध्ये घडली आहे. दत्ता अंबादास पाटोळे असं जीवन संपवलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. 

शेतकरी दत्ता पाटोळे यांना केवळ दीड एकर शेती आहे. शेतीवरच त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र अस्मानी संकटांने दत्ता पाटोळे हे मानसिक तणावत होते.

या आर्थिक संकटाच्या विवंचनेतून मानसिक तणावाखाली आलेल्या दत्ता पाटोळे यांनी त्यांच्या राहत्या घरी पत्राच्या शेडमध्ये जीवन संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे

No comments:

Post a Comment