Monday, July 24, 2023

धक्कादायक! बीड जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 147 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन.59 आत्महत्येची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र.

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या 6 महिन्यात तब्बल 147 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. कुणी गळफास घेऊन तर कुणी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्या आहेत. यामुळं शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहे.
1 जानेवारी ते 7 जुलै 2023 या 6 महिन्यांमध्ये 7 दिवसांच्या कालावधीत 147 शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. यातील 59 आत्महत्येची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. तर उर्वरित 57 प्रकरणे चौकशीवर असून आत्महत्येची 30 प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत.

कधी शेतीच्या समस्या तर कधी कर्जबाजारीपणा ही आत्महत्येची प्रमुख कारणे असल्याचं समोर आलंय. याबरोबरच पाण्याचे संकट अन् त्यामुळे शेतीतून न मिळालेले उत्पन्न अशा स्थितीत हवालदिल झालेला बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो आहे.

कोणी गळफास घेत आहे तर कोणी विषारी द्रव प्राशन करत आहे. शासन दरबारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना 1 लाखांची मदत दिली जातेय. मात्र मदत देण्यापेक्षा आमच्या मालाला हमीभाव द्या. अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

No comments:

Post a Comment