Sunday, July 30, 2023

परळीच्या शैक्षणीक क्षेत्राबद्दल तळमळ असणारे पत्रकार प्रशांत जोशी यांच्या निधनामुळे मोठी हानी- किरण गित्ते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पत्रकारीता क्षेत्रात मागील तीन दशकांहून अधिक काळ अत्यंत मोलाचे योगदान देणारे, परळी शहराच्या इतिहासापासून, सांस्कृतिक, शैक्षणिक, विविध  क्षेत्रांची जाण असलेले प्रशांतजी जोशी यांच्या दुखःद निधनामुळे शहराच्या वैभवात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आमच्या प्रत्येक परळी दौऱ्यादरम्यान प्रशांतजी आपुलकीने संपर्क ठेवायचे. दरवेळी शैक्षणिक क्षेत्रात अजून काय करता येईल याबद्दल तळमळीने बोलायचे. अनेक पुरस्कारांच्या व उपक्रमांच्या बातम्या ते स्वतः दखल घेवून इत्थंभूत लिहायचे. 
आज सकाळी प्रशांतजींच्या अकाली निधनाची बातमी कळली तेंव्हा विश्वासच बसला नाही. अगदी काही दिवसापूर्वी त्यांच्याशी संभाषण झाले होते व श्रावण महिण्यात भेटू असे ठरले होते. प्रशांत जोशींच्या जाण्याने एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, जेष्ठ पत्रकार व सच्चा मित्रांस आपण हरवलो आहोत. प्रशांतजींच्या आत्म्यांस शांती लाभो हीच प्रभू वैद्यनाथचरणी प्रार्थना ! भावपूर्ण_श्रद्धांजली

No comments:

Post a Comment