मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई शहराजवळ अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या डंपरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण गेवराई पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं.
प्रल्हाद दशरथ नेमाने (30 वर्षे. रा. धनगर गल्ली, गेवराई) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रल्हाद आपल्या दुचाकीवरुन गेवराई शहराकडे जात होता. त्याचवेळी बाह्यवळणाच्या रस्त्यावर त्याच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या वाळूच्या डंपरने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की प्रल्हादचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला आहेर वाहेगाव शिवारातून ताब्यात घेतले. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment