दरम्यान बीड शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात फाहाद इरफान, मोमीन जुबेर, श्रावण सचिन लांडे, सय्यद गौस, शीला प्रदीपसिंग लोहिया, अखिल आतार या ६ जाणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलाय. हल्ल्यात जखमी झालेल्यांला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे आजवर काही व्यक्तींना आपला जीव देखील गमवावा लागलाय. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांमुळे अपघाताची एक घटना घडली होती. या घटनेत दोन महिला आणि एक शाळकरी विद्यार्थी आपल्या स्कूटीवरुन प्रवास करत होते. यावेळी अचानक ५ ते ६ भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. सर्व कुत्रे त्यांच्या दुचाकीमागे पळू लागले. कुत्रे मागे पळत असल्याने दुचाकी चालक महिलेचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती थेट समोर असलेल्या ट्रकवर आदळली.
ट्रकवर आदळल्यावर दोन्ही महिला आणि लहान मुलगा हे सर्वजण हवेत फेकले गेले. अपघात झाल्याचं पाहताच मागच्यामागे या कुत्र्यांनी पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता देखील बीड शहरात कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.
No comments:
Post a Comment