बीड जिल्ह्यातील आष्टी नगरपंचायत भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे. या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पल्लवी धोंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष काेण हाेणार याची चर्चा आष्टीत हाेती.
आज नगराध्यक्षपदासाठी निवडणुक घेण्यात आली. या पदासाठी भाजपच्या जिया बेग यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिया बेग यांची निवड झाल्याचे जाहीर केले. जिया बेग यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील बेग यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment