अंबाजोगाई तालुक्यातील १७ वर्षीय पिडीता ही शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात राहते. यादरम्यान शहरातील नावाजलेल्या परिसरात दोन रोडरोमियोंनी पिडीतेचा विना नंबरच्या मोटारसायकलवर बसून पाठलाग केला. हॉर्न वाजवून तिची छेडछाड केली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात आकाश नागोराव डोंगरे (वय २१) आणि वैभव नामदेव चाटे (वय २१) या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अंबाजोगाईत शिक्षणासाठी येत असणाऱ्या मुली असुरक्षित तर नाहीत ना? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
No comments:
Post a Comment