Friday, April 7, 2023

पाटोदा ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम.हिंदू- मुस्लिम ऐक्याचा संदेश.अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी इफ्तारची पंगत.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) : गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडपामध्ये मुस्लिम बांधवांसाठी इप्तारची पंगत देऊन सामाजिक ऐक्याचा संदेश अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म ) येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी इफ्तारच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून एकीचा सदेश  दिला. पाटोदा येथे रामनवमी ते हनुमान जयंती या दरम्यान सप्ताह आयोजनाचे हे २९ वे वर्ष आहे. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर  महाप्रसादासाठी सर्व गावकरी सहभागी होतात. दरम्यान, गावातील मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना सुरु असल्याने इफ्तारच्या पंगतिचेही आयोजन ग्रामस्थांनी केले.

यावेळी गावचे सरपंच अविनाश उगले, आनंद स्वामी, हभप उगले महाराज, श्रीकृष्ण तोडकर, अशोक देशमुख, बाळासाहेब जामदार, बालाजी साखरे, चंद्रकांत सर्वदे, गोविंद घोरपडे, वैजेनाथ  तोडकर, होसेकर पडीत, विलास पन्हाळे, विलास पाटील, बलभीम जामदार, मौलाना शाहेद पठाण, हारून पठाण, इब्राहिम शेख, खलील पठाण, अलीम शेख, खाजामिया  पठाण, ताजखा  पठाण, जब्बार पठाण, मुन्शी सय्यद, इलाही पठाण, मुस्तफा शेख, युसूफ पठाण आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. 

No comments:

Post a Comment