Friday, April 7, 2023

प्रतिदेहू पावन धाम संस्थान येथे चैत्र पौर्णिमा निमित्त संत तुकाराम महाराजांच्या गाभाऱ्यात पाच क्विंटल द्राक्षांची सजावट.

*बार्शी येथील शेतकरी पांडुरंग पितांबर सुरवसे यांनी केली  ५ क्विंटल द्राक्षांची आकर्षक सजावट. 

केज(प्रतिनिधी)  तालुक्यातील प्रतिदेहू श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र पौर्णिमा निमित्त ५ क्विंटल द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
या विशेष सजावटीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा गाभारा हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. दिवसभर द्राक्ष सजावटीचे मनमोहक दृश्य पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले होते.यासाठी बार्शी येथील प्रगतशील शेतकरी  पांडूरंग पितांबर सुरवसे , यांनी आपल्या बागेतील तब्बल पाच क्विंटल द्राक्षाच्या सजावट केली. दिवसभर भाविक भक्तांनाही द्राक्षांचा प्रसादरूपी गोडवा चाखायला मिळाला.
मासिक पौर्णिमे निमित्त ह.भ.प शंकर महाराज आळंदीकर यांची किर्तन सेवा झाली. बोरीसावरगाव ग्रामस्थांकडून अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल जाधव महाराज, अशोक वाघ महाराज, हनुमंत सिरसाट महाराज,जनार्धन महाराज चलवाड,आनंदगाव येथील काकासाहेब गायकवाड,ताराचंद गायकवाड पंचक्रोशीतील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment