Thursday, November 10, 2022

मा.सभापती व सरपंचाचे केज तहसील कार्यालया समोर उपोषण. नंदकिशोर मुंदडांनी घेतली उपोषणार्थींची भेट.


केज (प्रतिनिधी) केज तालुक्यातील भाटुंबा येथील ग्राम पंचायतीच्या चुकीच्या पद्धतीने केलेली वॉर्ड रचना यासह विविध मागण्यांसाठी केज पंचायत समितीचे माजी सभापती आणि सरपंच यांच्यासह गावकरी उपोषणाला बसले आहेत.

या बाबतची माहिती अशी की,केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे आणि भाटुंबा येथील सरपंच सुनील धपाटे यांच्या नेतृत्वाखाली भाटुंबा गावातील सुमारे ३० ते ३५ नागरिक उपोषणाला बसले आहेत. त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी जाणुन बुजुन ग्रामपंचायतची चुकीचे वार्ड रचना केली आहे. मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या कामाचे वेतन अदा झालेले नाही. ग्रामपंचायतचे संगणक चोरून नेलेले आहे. राष्ट्रीय पेय जल योजनेत केलेल्या भ्रष्टाचार. अंगणवाडी बांधकामाचे खोटे दस्तावेज देऊन पैसे उचलले. आर ओ फिल्टर न बसविता कागदोपत्री बसविलेले दाखवून पैसे उचलले आहेत. आर ओ फिल्टरसाठी रूम बांधकाम न करता पैसे उचलले आहेत. इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर असलेल्याव लाभार्थ्यांनी बांधकाम न करता जुने बांधकाम दाखवून पैसे उचलले आहे. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघड़ करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. या सर्व बाबींची चौकशी करून यावर कारवाई करावी अशी उपोषणार्थींची मागणी आहे.

No comments:

Post a Comment