Monday, November 21, 2022

नात्याला काळीमा फासणारी घटना नराधम बापाने आपल्या ११ वर्षाच्या सावत्र मुलीवरच केला अत्याचार.

पुणे (कांतीकारी साथी न्युज) या प्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या ३२ वर्षाच्या दुसर्‍या पतीविरुद्ध बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार ९ नोव्हेबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एक ११ वर्षाची मुलगी आहे. त्यांनी दुसरा विवाह केला . ते एकत्र रहात असताना तिच्या दुसर्‍या पतीने ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. तिच्याशी वारंवार घाणेरडे चाळे केले. ही गोष्ट मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुळीक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment