पुणे (प्रतिनिधी) येरवड्यातील अग्रसेन हायस्कूल ते डॉ. आंबेडकर सोसायटी मुख्य चौकापर्यंत गोल्फ कोर्स भिंतीच्या लगत शुक्रवारी सकाळपासून सांडपाण्याच्या वाहिनीचे पाणी तुंबले आहे. संपूर्ण दिवस जाऊनही महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणती उपाययोजना करण्यात आलेली नाही. पावसाचे पाणी साचण्याची समस्या ही नित्याचीच होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार सुनील टिंगरे यांनी दिल्या होत्या. महापालिका प्रशासनाने केवळ तात्पुरती उपाययोजना करून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसले आहे. पावसाळी पाण्यासोबतच सांडपाण्याच्या वाहिनीचे पाणी तुंबण्याची समस्या आता नित्याचीच झालेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. स्थानिक नागरिकांना दुर्गंधी सह साचलेले पाणी स्थानिक नागरिकांच्या अनेकदा घरात शिरते आहे. केवळ ठेकेदारांच्या हितासाठी दिखाऊ काम करून बिले काढण्याचा धंदा सर्रास सुरू आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या या गंभीर समस्येसाठी जबाबदार अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांच्यावर महापालिका आयुक्त कारवाई करणार का? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असणारा या समस्येला नेमके जबाबदार कोण? आणि त्यावर महापालिका प्रशासन कधी उपायोजना असा सवाल या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे.
No comments:
Post a Comment