Monday, November 21, 2022

शिवशक्ती,भीम शक्ती ची वज्रमुठ शिवसेना (ठाकरे) आणि वंचित आघाडी एकत्र युती होणार? प्रकाश आंबेडकर यांचा स्पष्ट संकेत.

 

मुंबई (कांतीकारी साथी न्युज) रा ज्याच्या राजकरणाचा कधी आणि कसा राजकीय आखाडा भरेल याचा काही सध्या नेम नाही.! महाविकास आघाडीला धक्का देत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची (ठाकरे) साथ सोडत भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले असून, आता शिंदे गट आणि भाजपला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. तर याबाबद खुद्द प्रकाश आंबेडकर'यांनीच आता, युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने.! शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेआणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. तर ताबडतोब युती झाली तर चांगलंच आहे असं मत  प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

तसेच महाराष्ट्रामध्ये सध्या जे सरकार आहे, ते सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीवर चालू असून, सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे. त्यांनी स्थगितीचे जे आदेश दिले आहेत; त्यावर तातडीने निर्णय घ्यावा. हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही' असं परखड मत आंबेडकर यांनी मांडलं. तर, उद्धव ठाकरे म्हणाले, की आज एक प्रकारे कौटुंबिक रूप पाहायला मिळत आहे. दोन नातू एकत्र आलेत. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास राज्यात मोठा बदल घडू शकतो; अशी प्रतिक्रिया राजकीय जाणकार देत आहेत. 

No comments:

Post a Comment